संकल्पित प्रमुख उद्दिष्टे

१) सर्व विषय प्रामुख्याने संतवाङ्गमय, वेद, वेदांगे, पुराणे, उपनिषदे, विद्या, कला तसेच हिंदू धर्मातील अव्दैत तत्वज्ञान, आद्य शंकराचार्य व श्री ज्ञानेश्वर माउली यांचे समग्र वाङ्गमय, श्रीदासबोध, श्रीभगवद्गीता, श्रीएकनाथी भागवत , विश्वकोश तसेच श्रीदत्तसंप्रदाय, श्रीनाथसंप्रदाय याबद्दलची समग्र हस्तलिखिते व पुस्तके एकत्र करणे, त्यांचे योग्य जतन करणे. तसेच श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयात त्यांचे Digitization करून Digitized e-Library चे निर्माण करणे.
* अभ्यासकांना श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय, आळंदी येथे e-Library इंट्रानेट द्वारे पहिल्या टप्यात उपलब्ध करून देणे.
* कालांतराने विश्वभरातील अभ्यासकांना e-Library इंटरनेट सुविधेने उपलब्ध करून देणे.
२) जगभरातील समस्त ई-लायब्ररीज् आपलया ई-लायब्ररीला जोडून माहितीचा जो दुर्मिळ साठा जगभरात अनेकविध ठिकाणी पसरला आहे, तो एका क्लिकवर , एका पोर्टलवर समस्त साधकांना व अभ्यासकांना सहजतेने व नाममात्र मोबदल्यात उपलब्ध करून देणे.
3) संस्थेमध्ये प्रामुख्याने संतवाङ्गमय संशोधन व तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी विविध तज्ञांकडून शिक्षण व संशोधन प्रकल्प हाती घेणे. ज्याला जे संतवाङ्गमय शिकण्याची इच्छा असेल, ते शिकता यावे; या दृष्टीने विविध विषय शिकवण्यात येतील. तसेच हिंदुधर्मातील स्तोत्रे, सूक्ते, पवमान, रुद्रपठण, इ. तसेच प्रामुख्याने श्रीदासबोध, श्रीगीता, श्रीएकनाथी भागवत, श्रीज्ञानेश्वरी, श्रीयोगवासिष्ठ या ग्रंथांवर अभ्यासवर्ग घेण्यात येतील. त्याच्यावर परीक्षा आयोजित करून प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विविध डिप्लोमा, डिग्री अभ्यासक्रम पण आयोजित केले जातील.
४) संतांची शिकवण, प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध गावी तत्वज्ञान व संत साहित्य अभ्यासकांची व्याख्याने/प्रवचने/ वासंतिक वर्ग/ शिबिरे आयोजित करण्यात येतील.
५) ज्ञानपीठातील विविध संशोधनाव्दारे सिध्द होणारे अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित केले जातील. तसेच संत संदेश घरोघरी पोचवण्यासाठी संतवाङ्गमय अल्प किंमतीत उपलब्ध करून दिले जाईल.
६) संतवाङ्गमयाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कीर्तनकार व प्रवचनकार यांचा यथोचित सत्कार करणे.
७) अध्यात्मिक कीर्तने व प्रवचने यांचे ऑडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंग्स जतन करून अभ्यासकांना उपलब्ध करून देणे.
८) वारकरी, नारदीय कीर्तन, प्रवचन यांचे शिक्षण व गुरुकुल पध्दतीचे शिक्षण व संवर्धन करणे.
९) कालमान बदलानुसार संस्थेचा सुयोग्य प्रचार व प्रसिध्दी होणे, यासाठी अध्यात्म/ तत्वज्ञान/ संशोधन/ संत संप्रदाय/ वारकरी संप्रदायातील मार्गदर्शक तसेच सामाजिक काम करणाऱ्या संस्थाचालकांना संस्थेत आणून संस्थेच्या कार्याचा समग्र परिचय करून देणे व संस्थेच्या पुढील कार्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे.

