Video Snippets from Abhyasvarga


| अभ्यास सत्र | श्री सद्गुरू बोधवचन |
| क्रमांक १ दिनांक २७.०२.२०२२ अभ्यास सत्राचा विषय भागवत धर्म: व्याख्या, व्याप्ती, स्वरूप भागवत धर्म : आत्यंतिक क्षेमाचे साधन, भगवत्भक्तांची लक्षणे | श्री भगवंतांची प्राप्ती होणे म्हणजे “योग”; आणि प्राप्त झालेले ते तत्व टिकवून ठेवणे हाच “क्षेम” होय. |
| क्रमांक २ दिनांक ०६.०३.२०२२ अभ्यास सत्राचा विषय मायेचे स्वरूप, मायेवर विजय मिळवण्याचे उपाय, सद्गुरू आणि सत्शिष्य लक्षणे, अभक्तांची गती | कुठल्याही स्थितीत, मनात आलेले सद्विचार हे टाळू नयेत. स्वत:च्या चुका निर्भयपणे कबूल कराव्यात. चुका दुरुस्त करण्याच्या आड अहंकार येऊ देऊ नये. |
| क्रमांक ३ दिनांक १३.०३.२२ अभ्यास सत्राचा विषय कर्मसिद्धांत, कर्मविचार, कर्माची व्याख्या, कर्माचे स्वरूप कर्माची व्याप्ती, कर्माचा कर्ता, जीव की आत्मा कर्मफळ, कर्माचा त्याग, प्रकृतीपर की निवृत्तीपर कर्मसाम्यदशा पुण्यकर्मे आणि पापकर्मे यांचा समतोल | प्रपंचात आपण आणलेले भांडवल वाढत गेलेले चांगले असे म्हणतात. पण परमार्थात आणलेले भांडवल संपत चाललेले चांगले असे म्हणतात. |
| क्रमांक ४ दिनांक २०.०३.२२ अवधूतांचे २४ गुरु | सद्गुरूंचे दर्शन, स्मरण होताच शिष्याला गहिवरून यावयास हवे; एवढे त्याचे सद्गुरूंवर प्रेम असावयास हवे. त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दर्शनाने शिष्याचे अष्टसात्विक भाव जागृत व्हावयास हवेत. |

