अभ्यास सत्र क्रमांक १ दिनांक २७.०२.२०२२
Message
भागवत धर्म: व्याख्या, व्याप्ती, स्वरूप
आत्यंतिक क्षेमाचे साधन,
भगवत्भक्तांची लक्षणे
श्री सद्गुरू बोधवचन
श्री भगवंतांची प्राप्ती होणे म्हणजे "योग ";
आणि प्राप्त झालेले ते तत्व टिकवून ठेवणे हाच "क्षेम " होय.
सहेतुक, अहेतुक कर्मे, लौकिक, वैदिक,स्वाभाविक कर्मे श्रीभगवंतांचे ठायी अर्पण करणे म्हणजे भागवतधर्म पालन करणे.
इंद्रिये , बुद्धी, अहंकार यांच्या माध्यमातून कर्मे घडतात. मानसिक, वाचिक आणि कायिक कर्मे ही तीन प्रमुख कर्मे. यांचे समर्पण करायचे आहे.
आपल्या नित्योपासना या पुस्तिकेत जो दिनक्रम सांगितला आहे त्यातही रात्री झोपी जाण्यापूर्वी सद्गुरूंना नमस्कार करून आपली सर्व कर्मे त्यांनाच समर्पित करून झोपी जावे असे सांगितले आहे.
मग ती चांगली कर्मे असोत वा वाईट कर्मे ती सारी कर्मे आणि त्यांचे फळ तुम्हालाच समर्पित असो अशीच प्रार्थना केली म्हणजे कर्म-समर्पण आपोआप घडते.